ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांना आपत्कालीन तातडीच्या उपाययोजना प्रशिक्षण संपन्न

240

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : जागतिक युवा कौशल्य दिन या निमित्ताने शिरूर मधील ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन’ या आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेने ‘ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल’, जांभळी मळा या शाळेतील विद्यार्थ्यांना आपत्कालीन उपाययोजना या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. आजच्या धावत्या युगाची अनेक आव्हाने आपल्या तरुणाई समोर उभी आहेत यांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आजच्या युवा पिढीला अनेक कौशल्य व तंत्र आत्मसात करावी लागणार आहेत. काळाची ही गरज ओळखत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेने अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना नाडी ठोके परीक्षण, रक्तदाब तपासणी, शरीराचे तापमान, जखमेवर प्रथमोपचार, विजेच्या धक्क्यापासून  संरक्षण, अचानक रुदय विकार उद्भवल्यास, घ्यावयाची काळजी या गोष्टींचे प्रशिक्षण दिले. मुलांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ही माहिती ऐकत नवीन गोष्टी आत्मसात केल्या. अशा उपयोगी व विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारे प्रशिक्षण राबविल्याबद्दल पालकांकडून कौतुक होत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी संगीता बेलोटे, ग्रीष्मा सुपलकर, आकाश शिंदे, मनोज शिंदे, शितल पुजारी, पूजा बेलोटे, ज्ञानेश्वर जाधव, सचिन पोटघन या स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. अशा स्तुत्य उपक्रम आला संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजाराम घावटे सर तसेच सीईओ नितीन घावटे सर यांचा पाठिंबा मिळाला. ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल च्या प्रिन्सिपल रुपाली जाधव मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण उत्तम रित्या पार पडले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *