हिवरे रस्त्याची दुरावस्था ; काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात सुरवात

323

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील पाबळ चौकातून हिवरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली असून, मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. येथील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघात सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शिक्रापूर येथील पाबळ चौक येथून हिवरे कुंभार, कान्हूर मेसाई, खैरे नगर, पिंपळे खालसा, खैरेवाडी, वाबळे वाडी यांसह आदी गावांना मिळणारा हा मुख्य रस्ता असून रस्त्यावर अगदी खड्ड्यांची रांगोळी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने लहान मोठी वाहणे आदळुन अपघात होत आहेत. या रस्त्यालगत शाळा व महाविद्यालय असल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिक नागरीकांसह पादचारी नागरिकांना या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबधित खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या पुजाताई भुजबळ यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *