शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन 

1077
शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे आज गुरुवार दि. ११ ला निधन झाले. मृत्यू समयी ते ७१ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने उपचार घेत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची भेट घेत ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली होती.
 त्यांच्या पश्चात पत्नी मालतीताई, मुलगा राहुल, मुलगी नीलिमा, तीन भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. पाचर्णे यांचा शिरूर शहर व पंचक्रोशीत नात्यागोत्याचा मोठा गोतावळा असून, गेल्या तीन चार दशकांपासून शिरूर शहर व परिसरात पाचर्णे यांचे अनेकांशी घनिष्ट संबंध होते. शहरातील सर्व समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिरूर,हवेली तालुक्यात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. जवळचा माणूस गेला असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *