शनिवार पासून पुन्हा पावसाची शक्यता – माणिकराव खुळे 

256

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – दोन दिवसाच्या उघडीपीनंतर उद्या शनिवार दि.२० पासुन संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे जेष्ठ हवामान तज्ञ (सेवानिवृत्त,पुणे) माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यातल्या त्यात विशेषतः २१-२२ (रविवार -सोमवार) ला तर संपूर्ण खांदेश, नाशिक, नगर, पुणे सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ही ते म्हणाले.
दरम्यान मुंबईसह ठाणे,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता सध्या तेथे तरी अजुनही पुढील आठवडाभर म्हणजे २५-२६ ऑगस्ट पर्यन्त तरी तशीच कायम जाणवत असून त्यापुढेही त्यानंतर तेथे तरीही लवकर उघडीपी साठी चांगलीच वाट बघावी लागेल असे दिसत असल्याचे खुळे यांनी सांगितले.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक,पुणे,सातारा,कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील घोटी,इगतपुरी लोणावळा,मुळशी,ताम्हिणी,महाबळेश्वर,जावळी,बावडा,राधानगरी अश्या व परिसरातील नद्या उगम व धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही तेथे तशीच कायम असुन नद्या व कॅनॉल पात्रातील सध्या होत असलेला सततचा पुर-पाणी विसर्ग तसाच कायम व नियंत्रणात ठेवावा लागणार असल्याचा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात भाग बदलत विखुरलेल्या क्षेत्रात मध्यम तर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात व विदर्भात दि.२३ मंगळवार पासुन काहीशी उघडीप जाणवत असली तरी दरम्यानच्या काळात त्यानंतर तेथे तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरात ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारी पट्टी दरम्यान समुद्रातून आलेले कमी दाबाचे डिप्रेशन आज दि. १९ ला संध्याकाळी पूर्व किनारपट्टीवर बाळासोर व सागर बेटादरम्यान आदळून येत्या २-३ दिवसात झारखंड व छत्तीसगड कडे मार्गस्थ होऊन तेथे जोरदार पावसानंतर क्षीण होण्याची शक्यता जाणवते. मान्सूनचा आसही कदाचित  २६-२७ नंतर हळूहळू त्याच्या मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता असुन त्यानंतर महाराष्ट्रात उघडीपीची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *