शिरूर तालुक्यातील कल्पना कुरंदळे यांना ‘ट्रिपल जंप’ मध्ये रौप्य पदक

274
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : वुमेन्स मास्टर्स ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय वुमन्स मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 या क्रीडा स्पर्धा चार ते सहा नोव्हेंबर रोजी गचिबोली ॲथलेटिक्स स्टेडियम, हैदराबाद येथे पार पडल्या. यामध्ये ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारात कल्पना कुरंदळे यांना रौप्य पदक मिळाले तर पाच हजार मीटर स्ट्रेट वॉकिंग या क्रीडाप्रकारात कांस्यपदक प्राप्त झाले. त्याबद्दल महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. कल्पना कुरंदळे या ग्रामीण भागातील खेळाडू असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आण्णापुर या गावच्या त्या रहिवासी आहेत. सध्या पदवीधर शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हाळवाडी, तालुका हवेली येथे त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल हवेलीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *