अर्थसंकल्पात रेल्वे साठी २ लाख ४० हजार कोटी निधी ; मुरबाड रेल्वेसाठी निधी मिळणार का ? की पुन्हा रेल्वेचे गाजर ?

824
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : देशाच्या अर्थसंकल्प काल लोकसभेत मांडण्यात आला याअर्थसंकल्पाकडे जसे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते तसे मुरबाड सारख्या ग्रामीण भागाचे ही लक्ष लागून होते. याचे कारण म्हणजे मुरबाड रेल्वे ! खासदर व केंद्रिय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी मागील वर्षी मुरबाड रेल्वे 2024 मध्ये धावणार अशी घोषणा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या जाहिर सभेत करत मुरबाडकरांना रेल्वेचे खात्री दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नीती आयोगाकडे मुरबाड रेल्वेचा प्रस्ताव गेला असल्याचे सांगितले होते. 2024 ला देशात लोकसभा निवडणुका होणार असल्याने 2024 पर्यन्त रेल्वे येणारं हे सांगणं जेवढे अनिवार्य होते तेवढेच अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेच्या नव्या मार्गासाठी तरतूद होते की नाहीं हेही पाहणे गरजेचे होते. म्हणून मुरबाडकर पण या अर्थसंकल्पाकडे लक्ष लाऊन होते. देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यानी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटी रुपयाची निधीची घोषणा केली. तर नव्या रेल्वे मार्गासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी मंजुर केला आहे. मात्र यामध्ये मुरबाड रेल्वे चा समावेश होणारं की पुन्हा  मुरबाडकरांना रेल्वेचे गाजर मिळणारं असा प्रश्न उपस्थित होते आहे. मुरबाड रेल्वे हा  मुरबाडकरांसाठी अस्तित्वाचा तर खासदार कपिल पाटील यांच्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने 2024च्या लोकसभा निवडणुका पूर्वी मुरबाड रेल्वेला निधी मिळणार की रेल्वेचे गाजर? असा प्रश्न अर्थसंकल्पा नंतर उपस्थित होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *