कोरावळे विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पत्रकार बाळासाहेब भालेराव यांची बिनविरोध निवड !

230

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : तालुक्यातील कोरावळे विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पत्रकार बाळासाहेब भालेराव यांची बिनविरोध निवड झाल्याने, सहकार क्षेत्रातील कामात प्रकाराला संधी मिळाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. माजी आमदार गोटीराम पवार यांच्या व ठाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत मुरबाड तालुक्यातील कोरावळे ग्रामस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला सोसायटीचे चेअरमन पद बहाल केले, त्या बाबत पत्रकार बाळासाहेब भालेराव यांनी आभार मानले. या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन व आदर्श सोसायटीचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणेल असे स्पष्ट प्रतिपादन कोरावळे विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन पत्रकार बाळासाहेब भालेराव यांनी केले. यावेळी मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे,  आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, माजी नगरसेवक रवींद्र देसले, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, मुरबाड काँग्रेस कमिटी सदस्य संजय टोहके, शकील पठाण व मुरबाड मधील नामवंत मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष मोरे तसेच माजी चेअरमन पांडुरंग धुमाळ, माजी व्हाईस चेअरमन मंगल भांडे,  श्रीपत धुमाळ, शंकर धुमाळ, हरी धुमाळ, दशरथ तरे, गुलाब धुमाळ, अलका धुमाळ, मारुती धुमाळ, रघुनाथ धुमाळ, यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *