गांजेवाडीतून कृषी वीज बिल ग्राहकांकडून अडीच लाख रुपयांचा भरणा – १३ पैकी ११ ट्रान्स्फार्मर पुर्ववत सुरु – बातमीचा परिणाम 

268
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कृषीपंपाच्या थकलेल्या वीज बीला मुळे बंद करण्यात आलेले शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी,माळीमळा,घोड नदी किनारी असलेल्या सुमारे १३ ट्रान्स्फार्मर पैकी ११ ट्रान्स्फार्मर सुरु करण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे स्थानिक कर्मचारी सुरेश पवार,नवनाथ गावडें यांनी दिली. मागील तीन दिवसांत या परीसरातील शेतकऱयांनी सुमारे अडीच लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. अजून ही अनेक शेतकरी थकबाकी पैकी काही भरणा करणार असून वीज पुरवठा सुरळीत सुरु रहावा,शेतीपिकांना वीजे अभावी पाणी देण्यास अडचण येऊ नये याकामी  शेतकऱ्यांनी थकीत वीज बील का भरावे याबाबत नुकतीच येथील तुकाई देवी मंदिरात थकीत वीज बिल ग्राहक महावितरणचे कर्मचारी स्थानिक कर्मचारी सुरेश पवार,टाकळी हाजीचे एस डी जोगाई,शेख मामा,बाह्यश्रोत कर्मचारी नवनाथ गावडे यांची या प्रश्नी चर्चात्मक बैठक संपन्न झाली होती. या विषयीचे सविस्तर वृत्त सा.समाजशील मधून देण्यात आले होते. या वृत्ताचा व बैठकीचा सकारात्मक परिणाम होत मागील ३ दिवसांत सुमारे अडीच लाख रुपयांची थकीत बाकी शेतकऱयांनी जमा केली आहे. बंद ठेवण्यात आलेल्या १३ ट्रान्स्फार्मर पैकी ११ ट्रान्स्फार्मर सुरु झाल्याने ऐन उन्हाळयात संबंधित वीज ग्राहक शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होणार असून शेतातील पिकांना व जनावरांना पाणी देता येणार असल्यानचे शेतकरी मनोहर वसंत नरवडे,कवठे येमाईचे भाऊसाहेब साळवे,सुभाष कारभारी इचके,अंकुश हनुमंत शिंदे,गोरक्ष शिंदे,प्रकाश डोके व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
           शेतकऱयांनी थकीत वीज बिले भरावीत व बंद करण्यात आलेले ट्रान्स्फार्मर लवकर चालू व्हावेत  म्हणून महावितरणअधिकारी,कर्मचारी,स्थानिक शेतकऱयांनी बैठकीत आवाहन करताच मोठा प्रतिसाद शेतकऱयांनी दिला.तीन दिवसांत सुमारे अडीच लाख रुपयांची वीज थकबाकी शेतकऱ्यांनी जमा केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *