महाशिवरात्र उत्सव व शिवजयंती उत्साहात – कवठे येमाईच्या फत्ते श्वर (महादेव) मंदिर प्रांगणात हरिनाम सप्ताहाची सांगता

512
 शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या मालीमाला रोडलगत घोडनदी किनारी असलेल्या ऐतिहासिक फत्तेश्वर (महादेव) मंदिरात मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची आज दि. १९ ला ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे (पाबळ) यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन सेवेने सांगता झाली. या नंतर उपस्थित हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
      मागील सात दिवसांपासून फत्तेश्वर मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु होता.दि. १२ ते १९ या सप्ताह काळात अखंड विणा वादन,काकड आरती,नियमित शिवलीलामृत पारायण,अभंगवाणी,हरिपाठ,हरिकीर्तन व दररोज महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले. आज काल्याच्या दिवशीच शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंगळे महाराजांनी यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या कीर्तन सेवेत छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थिती असल्याची माहिती मुघल यवनांना समजली. शिवाजी राज्यांना पकडण्यासाठी हे मुघल यवन तुकाराम महाराज करीत असलेल्या कीर्तन स्थळी पोहचले. आश्चर्य म्हणजे कीर्तन श्रवणासाठी उपस्थित बहुसंख्य श्रोते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसू लागले ते दृष्य पाहून मुघल यवनांनी तेथून पलायन केले. ही घटना पिंगळे महाराजांनी सविस्तर वर्णन केली. तर सप्ताह आयोजकांनी देखील शिवजयंतीचे औचित्य साधत त्या घटनेचा जिवंत देखावा सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. इयत्ता ७ वि तील कुमारी कार्तिकी शिंदे हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान सादर केले. तर सविंदणे येथील न्यायाधीशपदी निवड झालेले गोरक्ष लंघे यांनी तरुणांना उदबोधनपर मार्गदर्शन केले. अखंड हरीनाम सप्ताह व शिवजयंती उत्सवाचे श्री फत्तेश्वर मंदीर परिसर व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *