प्राचार्य डॉ. शंकर पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

159

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळाचे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटिरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मारुती पाटील यांचे दि 10 मे 2023 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेमुळे महविद्यालय परिसरासह तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून सुरूवात केलेले प्राध्यापक शंकर पाटील यांनी पुढे प्राचार्य पदाची धुरा सांभाळत महाविद्यालयाला अनेक नामांकन मिळवून दिले. विदयार्थी व आपल्या सहकाऱ्यांशी दाट निकटचे संबंध ठेवणारे प्राचार्य डॉ शंकर पाटील हे अनेक दिवसांन पासुन बोन कॅन्सर शी झुंज देत होते. त्याही परिस्थितीत ते आपल्या कार्यालयातील कामकाज हाताळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून ते कल्याण येथील आयुष हॉस्पिटल मध्ये उपचार घेतं असताना त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे पार्थिवावर त्यांच्या कराड तालुक्यातील अटके या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गोटिरामभाऊ पवार यांनी शोक व्यक्त करत एक चांगले व्यक्तिमत्त्व हरवल्याची खंत व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *