माळशेज घाट कामासाठी बंद ; अवजड वाहनांना बंदी

208

पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या राष्ट्रिय महामार्ग विभागाच्या सूचना

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कल्याण मुरबाड माळशेज राष्ट्रिय महामार्ग 61 वर 84.00 ते 101.00 पर्यंत दुहेरी काँक्रीटीकरण करणाचे काम प्रगती पथावर असल्याने तसेच पुणे जिल्हयातील 98.60 ते 100.280मध्ये दिनांक 19 मे 2023 पासुन पुढील दर गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत दगड फोडण्यासाठी विस्फोटकांचा वापर करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याने माळशेज घाट बंद करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रिय महामार्ग उपविभाग मुरबाड यांच्या कडून देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी मुरबाड तहसीलदार, मुरबाड -टोकावडे, पोलिस राष्ट्रिय महामार्ग पोलीस अधिकारी, एस टी महामंडळ, एम आय डी सी. यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. माळशेज घाटातील वाहतूक बंद केल्याने कल्याण मुरबाड माळशेज अहमदनगर निर्मल राष्ट्रीय महामार्ग 61 वरील वाहतूक नगर कडे वळविण्यात आली असुन, माळशेज घाट — खुबी – करंजाळे – खिरेश्र्वर – ते कोल्हेवाडी- सागनोरी – ते पिंपळजोग ते भोईरवाडी ते कोळेवाडी – ओतूर –  आळेफाटा ते अहमदनगर अशी पर्यायी मार्गाने जाणार आहे. मात्र या मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र माळशेज घाटातील रुंदीकरण व काँक्रीटीकरण यामुळें पावसाळ्यातील वाहतुकीचे निर्माण होणारे प्रश्र्न सुटणार असे बोलले जात असताना. काम वेळेवर झाल्यास पावसाळ्यात वाहतूक सुरळीत सुरु होईल अश्या प्रतिक्रया व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *