वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्रकार ला धमकी ; कठोर कारवाईची मागणी

525

भंगार विक्री प्रकरणी लावली होती बातमी ;

बातमी लावल्याचा राग मनात धरून दिली धमकी

पुणे  (समाजशील वृत्तसेवा) : मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील भंगार विक्रीत अफरातफर कारवाईची मागणी या मथळ्याखाली सा.समाजशील या वृत्त पत्रात लागलेल्या बातमीचा राग मनात ठेऊन मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद भंडारी यांनी दै.नवाकाळ व सा.समाजशील चे प्रतिनीधी जयदीप अढाईगे यांना धमकी देताना माझ्याशी पंगा घेऊ नका महागात पडेल, तसेच याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिल्याने पत्रकार जयदीप अढाईगे यांनी याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली असता त्यांच्यावर भा.द.वि. कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी ग्रामीण रुग्णालयातील भंगार विक्री बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या  तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार जयदीप अढाईगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांची प्रतिक्रिया घेउन या विषयी बातमी प्रसारित केली होती. आज दिनांक 26 मे 2023रोजी पत्रकार जयदीप अढाईगे यांच्या शेजारी राहणारी मुलगी प्रसूती झाल्यानें ते सहकुटुंब या मुलीला पहायला गेले असतां गेली दोन महिने रजेवर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद भंडारी हे अचानक समोरं दिसल्याने त्यांना कधी हजर झाले असे विचारले असता त्यांनी याचे उत्तर देत तुम्ही माझ्या विरोधा बातमी लावली याचा राग बोलून दाखवत तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका महागात पडेल, याचे परिणाम गंभिर होतील अशी धमकी दिली. पत्रकार जयदीप अढाईगे यांची पत्नी ह्या गेल्या 16 वर्षा पासुन नर्सिंग फिल्ड मध्ये कार्यरत आहे. त्यांनी नुकताच जून्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप काळात ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रसाद भंडारी यांच्या विनंती नुसार मदत केली. मात्र तुमच्या पत्नीस येथे संप काळात कामावर ठेवले याची जाण ठेवली पाहिजे अश्या प्रकारे मदत करणाऱ्यालाच जाण ठेवण्याचा उपदेश केला. मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील सावळा गोंधळ याकडे कायम दुर्लक्ष होत असताना भंगार विक्रीतील सत्यत्या मांडल्याने या अधिकाऱ्याने पत्रकारास धमकी दिल्याने सर्व पत्रकार संघटनेने याचा निषेध केला असुन, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांना हि या घटनेची माहिती दिल्याने ते काय करवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *