कृषी विभागाकडून कवठे येमाईत एक दिवसीय शिबीर – मात्र ईकेवायसी साठी शेतकरी उदासीन

178
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कवठे येमाई) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई,इचकेवाडी,मुंजाळवाडी परिसरातील १८४ शेतक-यांना पंतप्रधान सन्माननिधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार सीडिंग व ईकेवायसी करण्यासाठी आज मंगळवार दि.२० ला येथील ग्रामपंचायत कार्यालयात तालुका कृषी विभागामार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या विभागाचे कृषी सहाय्यक नंदू जाधव सकाळी साडेसातला च कवठे येथे दाखल झाले. मात्र ईकेवायसी साठी शेतकरी उदासीन असल्याचे पाहावयास मिळाले.
         दुपारी बारा वाजेपर्यंत जेमतेम सहा शेतकऱ्यांनी जाधव यांच्याशी संपर्क केला. जाधव यांनी हे करण्याकरीता समाज माध्यम व कृषी वार्ता फलकावर  संबधीत शेतकऱ्यांना सूचना ही केल्या होत्या. पंतप्रधान सन्माननिधीचे सहा हजार व राज्य सरकारचे सहा हजार असा बारा हजार रुपयांचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना होणार असून देखील वंचित लाभार्थी शेतकऱयांनी याकडे पाठ फिरवली. ह्या योजनेचा लाभ मिळणे कामी लाभार्थी शेतकऱयांनी तात्काळ आधार सीडिंग व ईकेवायसी करणे अत्यंत महत्वाचे असून तसे न केल्यास लाभार्थी शेतकऱयांना या योजनेचा पुढील चौदावा हप्ता प्राप्त होणार नसल्याचे नंदू जाधव यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले. तर उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग व ईकेवायसी  करून घेण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *