मुरबाड तालुक्यात प्राथमिक शाळांची दुरवस्था ; पंचायत समिती समोरं विद्यार्थ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन

284
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्यांत सत्ता संघर्ष पहायला मिळत असताना या राजकीय खेळात मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. मुरबाड तालुक्यातील तुळई जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वर्ग व पालक वर्गाने आज शाळेला टाळे ठोकून समस्या सोडविण्यासाठी मुरबाड पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यामुळें आज मुरबाड शिक्षण विभागाचा कारभार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेत 120 विद्यार्थी संख्या असून फक्तं 3 शिक्षक इयत्ता पहिली ते सातवी साठी कार्यरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असून त्वरित शिक्षक द्यावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. तर वरीष्ठ कार्यालयाकडून या शाळेची इमारत धोकादायक ठरवत नविन इमारत मंजुर होण्याआधीच पडल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा सवाल शालेय शिक्षण समितीने केला आहे.या समस्येतून मार्ग निघावा यासाठी तुळई शाळा व्यवस्थापन समिती ने मार्च 2023 पासुन पाठपुरावा सुरू केला होता. मात्र तीन महिन्यांत काहीच मार्ग न निघाल्याने अखेर आज मुरबाड पंचायत समिती समोर विद्यार्थ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. विशेष म्हणजे शिक्षण विभागातील नियमावली मुळे याचं गावातली पंचायत समितीच्या माजी सभापती स्वरा चौधरी या हतबल झालेल्या पहायला मिळाल्या यावेळी सभापती म्हणुन कुठलेच अधिकार नसल्यानें मी माझ्या गावच्या शाळेला शिक्षक देऊ शकले नाही याची खंत व्यक्त करत या बाबत काही अधिकार सभापतीना मिळावे अशी मागणी केली तर गट शिक्षण अधिकारी पानसरे मॅडम यानी तांत्रिक कारणास्तव या जागा रिक्त झाल्याचे सांगून वरिष्ठांची परवानगी घेउन शिक्षक उपलब्ध करून देऊन नविन इमारत मिळेपर्यंत ततूर्ता व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शाळेत बाळा चौधरी, शुभाष जाधव, दिनेश आर पी आय (आ) गटाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आप्पा घुडे ,तालुकाध्यक्ष संतोष विशे यांनी या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या धोरणाचा निषेध केला. तर गट विकास अधिकारी श्वेता पालवे मॅडम यांनी तुळई ग्रामस्थ व पालक वर्गाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालुक्यातील जवळपास 70 पदवीधर शिक्षक पद रिक्त असून, अनेक मुख्याध्यापक पद ही रिक्त असल्याचे समोर आले. तर अनेक शाळांवर पहिली ते चौथी साठी एकच शिक्षक उपलब्ध असल्यांचे समोरं आल्याने भिविष्यात या जागा रिक्त राहिल्यास मुरबाड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता घसरुन विदयार्थी वर्गाचे मोठे नुकसान होईल अशी भिती व्यक्त करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *