डोळे येण्याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या – तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे यांचे आवाहन 

287
 शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यात डोळे येण्याच्या आजाराचे रुग्ण वाढलेले असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे यांनी केले आहे. ते आज गुरुवारी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य अभियान अंतर्गत जन आरोग्य समिती व स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर सा.समाजशील सोबत बोलत होते.
           यावेळी शिरूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.प्रकाश आव्हाड,कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट,कनिष्ठ आरोग्य सहायक आबासाहेब सरोदे उपस्थित होते. या निमिताने डॉ.मोरे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेत,औषधांचा साठा,रुग्णांना दिली जाणारी आरोग्य सेवा,डोळे येणे,पावसाळी वातावरण असल्याने होणारे जलजन्य आजार व त्याविषयी आरोग्य विभागाकडून घ्यावयाची दक्षता या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
        कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळा व घरोघरी जाऊन डोळे येण्याच्या संदर्भात तपासणी करावी व अशा रुग्णांना तात्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना कराव्यात. या करीता आरोग्य पथके तयार करण्यात आली असून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्याचे डॉ.मोरे म्हणाले. येथील आरोग्य केंद्रात बहुतांशी आजारावरील औषधे उपलब्ध असून डोळे येण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगावी वेळीच डॉक्टरांचा सल्ला व उपचार करून कुठे ही बाहेर न फिरता घरीच आराम करण्याची गरज डॉ.मोरे यांनी व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *