मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आम आदमी पार्टीत जाहिर प्रवेश ; “AAP”आगामी निवडणुकी साठी मोर्चे बांधणी

549

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात आज आम आदमी पार्टी ची बैठक संपन्न झाली, या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. यावेळी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष  धनंजय शिंदे यांच्या उपस्थितीत  मनसे चे पदाधिकारी राजेन्द्र तुपे, समीर शेख यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

मुरबाड येथील शिवनेरी विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे जिल्हाध्यक्ष मुरारीलाल पचोरी, मृण्मयी भावे, फर्डे मुरबाड तालुकाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आम आदमी पार्टी ची दिल्ली, पंजाब या राज्यांत पुर्ण सत्ता असून गुजरात गोवा या ठिकाणीं पक्षाने पाय रोवले आहे. जिथे आपली सत्ता आहे अश्या राज्यांत वीज, पाणी, शिक्षण, या सारखे मूलभूत प्रश्न संपले आहेत. याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणे गरजेचे आहे असे यावेळी सांगत येत्या 15 ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्रदिनी ठाणें जिल्ह्यात तिरंगा रॅली चे आयोजन करून मुरबाड विधानसभेसह आगामी सर्व निवडणुकीत आम आदमी पक्ष लढवणार असून, सध्याचे सरकार व प्रशासनातील गैर कारभार याला मुळा सकट उपटून काढण्यासाठी आपला पक्ष काम करणारं असल्याचे धनंजय शिंदे यांनी सागितले. आम आदमी पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार धारेवर काम करत आहे. यावेळी मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांचा महापुरुषांचा अपमानाचा तीव्र निषेध व्यक्त करत मणिपूर घटनेला अनेक दिवस उलटले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही या राज्यात गेले नाही. तर यावर काही बोलत नाही यामुळे या घटनेला केन्द्र व राज्य सरकार दोषी असल्याचे सांगत या दोन्ही सरकारचा निषेध केला. तर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वर ही आरोप करत आम आदमी  पार्टी ने अधिवेशन काळात मणिपूर घटनेचा निषेध  नोंदविला. त्यांनतर माझ्या मतदार संघात कोणीही मणिपूर घटनेचा निषेध करणार नाहीं असा विश्वास व्यक्त केला. यामुळे मणिपूर घटनेला एकप्रकारे पाठिंबा देत असल्याचा गंभिर आरोप केला. आगामी काळात आम आदमी पार्टी मुरबाड विधानसभा लढवणार असल्याचे सांगत या बैठकीच्या निमित्ताने मुरबाड मध्ये आगामी सर्व निवडणुकीची रणनीती आखण्याची सुरूवात केली आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *