भिवंडी लोकसभा क्षेत्रातील पन्नास पत्रकारांची संसदेला भेट ; खासदार कपिल पाटील यांच्याशी संसदेत साधला संपर्क

409
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :ठाणें जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदार संघातील मुरबाड, भिवंडी, बदलापूर, यापरिसरतील ५० विवीध वृत्तपत्राचे, अनेक वाहिन्यांच्या पत्रकारांनी खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून संसद, राष्ट्रपती भवन याला भेट देउन केंद्रिय पंचायतराज मंत्री व खासदार कपिल पाटील यांच्या दिल्लीतील कार्यालयांत प्रत्यक्ष भेट घेऊन लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्नांन बाबत चर्चा केली. मुरबाड रेल्वे, शहापूर ते कर्जत महामार्ग, कल्याण माळशेज चौपदरीकरणं, पंचायतराज कार्यालयाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधितील अपूर्ण कामे, भिवंडी मेट्रो या सारख्या विवीध प्रकल्प व त्यातील अडचणी कश्या सोडविल्या जातील या वर चर्चा करण्यात आली. ठाणें जिल्ह्यातील भिवंडी हा मतदार संघ शहरी व ग्रामीण भागाचा असल्याने या परिसरातील पत्रकार हे विधानसभा अथवा विधान परिषदेत अनेक वेळा जातात मात्र याचं ग्रामीण भागातील पत्रकारांना दिल्लीतील लोकसभा व राज्यसभेचा कारभार प्रत्यक्ष पहाता यावी, तसेच राष्ट्रपती भवनाची माहिती व्हावी या दृष्टीने केंद्रिय पंचायतराज मंत्री व खासदार कपिल पाटील यांनी हा पत्रकारांची सहल आयोजित केली होती. ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकाराची अशी पहिलीच दिल्ली भेट असल्याने सर्व पत्रकारांनी हि या सहलीचा आनंद लुटला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *