हर्षल यशवंतराव मुरबाड तालुक्यातील पहिला ‘अग्निविर’

246

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील पहिला भारतीय सैन्य भरती च्या नव्या प्रक्रियेत अग्नीविर म्हणुन निवड झालेला आंबेळे बु गावातील हर्षल विजय यशवंतराव सैनिक म्हणून देश सेवेच्या कार्यात रुजू होण्यासाठी जात असताना समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून बँड पथकात वाजत गाजत मिरवणूक काढून त्याला देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्य पद्माताई पवार, ठाणे जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेचे संचालक तथा शिवसेना पक्षाचे तालुका सचिव धनाजी दळवी ,मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन पवार ,सरपंच रमेश दळवी हर्षल चे वडील विजय यशवंतराव ,आई सीमा यशवंतराव ,सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन भरत पवार, विजूतात्या पवार, माजी सरपंच गीता ताई पवार, हरिचंद्र पवार, रमेश तुंगार, गजानन पवार, दिलीप पवार, माणिक हरणे, नितीन पवार, शिवाजी यशवंतराव ,स्नेहल पवार ,उदय पवार ,प्रभाकर पवार ,संजय पवार ,रवींद्र पवार, उमेश पवार ,तातू पवार ,हरिभाऊ पवार, लक्ष्मण पवार  दत्ता पवार ,नयन वाकचौरे ,हरिचंद्र पष्टे ,संतोष पवार ,बाळू पवार, हेमंत पवार, काळूराम व्यापारी, किरण पवार, अनंता पवार संपूर्ण यशवंतराव कुटुंबीय ,सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, विशेषता मार्गदर्शक सोनवणे गुरुजी सपत्नीक गावातील सर्व तरुण महिला या सर्वांनी हर्षला देशसेवेच्या कार्यासाठी उपस्थित राहून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना धनाजी दळवी व चेतन पवार यांनी असे सांगितले की, “हा आमच्या गावाचा सुपुत्र देश सेवेसाठी जात आहे. याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्याच्या आई-वडिलांचे कौतुक केले व आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत” असे सांगितले. हर्षल चे मनोबल वाढवण्यासाठी वंदे मातरम, भारत माता की जय या मंत्रघोषाने पूर्ण गाव दुमदुमून गेला होता. गावाच्या विकासात व सांस्कृतिक परंपरेत वाढ होत असून महसूल, शेती ,शिक्षण जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांतील सेवा, कंपनी सेवा वैद्यकीय शिक्षण ,अभियांत्रिकी शिक्षण अशा विविध क्षेत्रात गावातील मुले व व्यक्तींचा उल्लेखनीय कामगिरी आहे. आज आपल्या सुपुत्र देश सेवेसाठी सैनिक म्हणून जातोय या वैभवात भर टाकण्याचा हर्षल ने काम केले. याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलं. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *