मुरबाड तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडून कार्यक्रम जाहिर

309
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून, मुरबाड तालुक्यांतील 29 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील साजई, टेंभरे (बु),मढ,पेंढरी, सोनावळे, फांगळोशी, जडई, काचकोली, न्हावे, नढई, म्हाडस,चिखले, सोनगाव, कळंभे, कोरावळे,कुडवली, माजगाव, वांजळे,  ओजीवले टोकावडे, बळेगाव,तळेगाव बा, मानिवली खु!!, देवगाव,  कासगाव, खापरी, महाज, अस्कोत, रामपूर या ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने याठिकाणी निवडणुका लागल्या आहेत. मुरबाड तालुक्यातील या 29 ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे. मुरबाड विधानसभा क्षेत्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, या सर्वच राजकीय पक्षात गटबाजी असून आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांच्यातील उभा वाद पहायला मिळत असल्याने राजकारण चांगले तापले आहे, शिवसेनेचे सुभाष पवार यांना खासदार कपिल पाटील मदत करतील का ? अशी चर्चा सर्वत्र सूरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. 29  ग्रामपंचायती पैकी अनेक मोठ्या  ग्रामपंचायत असून त्या ताब्यात ठेवणे राजकीय पक्षांसाठी व नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे असणार आहे. राज्य निवडणुक आयुक्तांनी आदेश दिल्याप्रमाणे या ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 या काळात नामनिर्देशन पत्रे सादर करावी लागणार आहेत. 23 ऑक्टोबर 2023 रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देश पत्रे मागे घेता येतील तर 5 नोव्हेंबर 2023 रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *