किमान शाळेसभोवतालचे अतिक्रमण तरी तात्काळ काढा ! – शाळा व्यवस्थापन समितीची मागणी 

339
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे प्राथमिक शाळेसमोरून समोरून व गावठाणातून गेलेल्या अष्टविनायक महामार्गालगत किमान शाळेच्या सभोवतालची असलेली अतिक्रमणे तरी तात्काळ काढा अशी मागणी कवठे येमाईचे माजी सरपंच बबनराव मारुती पोकळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश पोळ,समितीतील सर्व सदस्य,मुख्याध्यापक शांताराम पोकळे व शाळाप्रेमी ग्रामस्थांनी केली आहे. एस एम बलशेटवार उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम क्रमांक ४ पुणे यांनी कवठे येमाईत महामार्गविभागाकडून कारवाई करण्यात येईल व त्यासाठी लागणारा खर्च हा संबंधित अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येईल असा नोटीसी द्वारे इशारा देऊन ही स्थिती जैसे थे आहे.याबाबत प्रशासन सुस्त वाटत असल्या ने न्याय कोणाकडे मागायचा ?असा सवाल व्यक्त होत आहे.
       येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील भिंतीलगत असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांनी या विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर हा विभाग खडबडून जागा झाला होता. नोटीसी दिल्या पण पुढे काहीच कार्यवाही नसल्याने या विभागाचे उपविभागीय अभियंता एस एम बलशेटवार यांना पुन्हा संपर्क केला असता आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कवठे येथील शाळे भोवतालचे अतिक्रमण पाहून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना तात्काळ देत असल्याचे सांगितले.
       शाळेसमोरील शेड,टपरी,अनधिकृत बांधकाम अतिक्रमण प्रश्नी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच त्वरित लक्ष घालावे व हे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी महसूल,पोलिसयंत्रणा व सार्वजनिक रस्ते विभाग यांना किमान कवठे प्राथमिक शाळेसमोरील व भिंती सभोवतालच्या बाजूचे अतिक्रमण हटविण्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करून तशा सूचना देण्याची मागणी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती कवठे,सरपंच सुनीताताई बबनराव पोकळे व ग्रामस्थांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *