भारताची ‘गोल्डन गर्ल’ धावपटू हिमा दास यांनी ज्ञानगंगा विश्वविद्यालय येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

298

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : मुलांना खेळू द्या त्यांना खेळण्याचे स्वातंत्र्य द्या, खेळात मोठे करीयर आहे .माझ्या जन्म धावण्यासाठी झाला असून त्यातच माझे करीयर घडवले असल्याचे सांगून हिमा पदकाच्या मागे नाही तर वेळेच्या मागे धावली अश्या शब्दात आपल्या भावना अर्जूनपुरस्कार प्राप्त धावपटू हिमा दास यांनी व्यक्त केल्या. हेलिंग लाईव्हस या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असुन त्यानिमित्ताने भारताची सुवर्णकन्या, स्वर्ण पदक विजेती, 400 मीटर धाव मध्ये जागतिक रेकॉर्ड नोंदवणारी भारताची धावपटू, अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमा दास शिरुर येथे आले असता त्यांनी शिरुर शहरातील ज्ञानगंगा विश्व विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी हेलिंग लाईव्हसच्या जान्हवी विश्वनाथन, हिलिंग लाईव्हसचे महाराष्ट्र प्रमुख संतोष सांबारे, ज्ञानगंगा विश्व विद्यालयाच्या विश्वस्त सविता घावटे,अमृता घावटे, प्रसाद घावटे, दीपक घावटे, डॉ .नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले, मुख्याध्यापिका रुपाली जाधव,उपमुख्याध्यापिका सुनंदा लंघे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दास म्हणाल्या की स्पोर्टस हे खूप आजारापासून दूर ठेवणारे एक औषध आहे. मी छोट्यासा गावातून आलेली मुलगी असुन यशासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. स्वंत :चे निर्णय स्वंत :घ्या . तुमच्यातील आत्मविश्वास तुम्ही स्वतः : वाढवू शकता.पालकांनी मुलाना हे करु नका ते करु नका असे न सांगता मुलाना जे आवडते ते करु द्यावे. मुलांना खेळण्याचे स्वांतत्र्य द्या. व्यवहारिक ज्ञान द्या . कमी बोला व काम जास्त करा असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्याना दिला . ज्या क्षेत्रात करीयर करायच ठरवल त्यात आव्हान , अडचणी येतील पाठिंबा ही मिळेल पण कोणत्याही परिस्थितीत जे ठरवल आहे ते करा .नकारात्मक विचारापासून दूर रहा. यश मिळाले तरी हे यश डोक्यात जावू देवू नका व अपयश आले तरी खचू नका असा यशाचा कानमंत्र ही दास यांनी दिला. हिलिंग लाईव्हच्या जान्हवी विश्वनाथन म्हणाल्या की जे अशक्य आहे ते तुम्ही शक्य करु शकता.मी हे करु शकत नाही ही भीति दूर करा .आपल्या ताकदीला व कमजोरीला जाणून घ्या, त्यामुळे आपण जीवनातील संकटाना व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जावू शकतो .कोणतेही काम आनंदाने करा . मी अपयशावर विश्वास ठेवत नाही चूकातून शिकून यशापर्यत जाण्याचा प्रयत्न करते असे सांगुन विद्यार्थ्यानी आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा .आपल्या ह्र्दयाची भाषा ऐका व आवडते ते काम करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्याना केले. यावेळी अमृता घावटे व संतोष सांबारे यांची ही मनोगते झाली. हिमा दास यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *