शासकीय रेखाकला परीक्षेत आलिया तांबोळी ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण –  कवठे विद्यालयाची स्पर्धेत उज्वल निकालाची परंपरा कायम

373
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – सन २०२३ – २०२४ साठी घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून आलिया तांबोळी ही एकमेव विद्यार्थीनी ए ग्रेडने उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.आलिया ने या परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे व विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षकांचे परिसरातुन विशेष कौतुक होत आहे.
शासकीय रेखाकला परीक्षा २०२३-२४ इंटरमिजिएट ग्रेड परीक्षामध्ये या विद्यालयातील ३९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त – ए  ग्रेड मध्ये ०१, बी ग्रेड – ०७, सी ग्रेड मध्ये ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ए ग्रेड मध्ये तांबोळी आलिया शरीफ,बी ग्रेड मध्ये इचके श्रेया राजेंद्र,सांडभोर श्रेया भाऊसाहेब,इचके दिव्या संदिप,शिंदे तनुजा प्रकाश,पुंडे भक्ती मच्छिंद्र,ईचके वेदांत हरिभाऊ,कोकणे अदिती भाऊ हे विद्यार्थी चमकले तर सी ग्रेड मध्ये एकतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना मच्छिंद्र करंजकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक व पत्रकार संघटना भारत चे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक ,समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक,जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम ईचके,डॉ सुभाष पोकळे, सरपंच सुनीता पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव,माजी सरपंच दिपक रत्नपारखी,रामदास सांडभोर,बाजीराव उघडे,माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव गावडे, विठ्ठल घोडे, सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफना,अविनाश पोकळे, विठ्ठल मुंजाळ यांनी अभिनंदन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *