मुरबाड,ठाणे : तालुक्यातील दुर्गम भागातील शिरोशी येथे महिला आरोग्य व डोळे तपासणी शिबीर संपन्न

741

   मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील अति दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोशी येथे कुणबी समाज संघटना मुरबाड,वसंत लीला वुमेन्स वेलफेअर असोसिएशन ठाणे एम्स हॉस्पिटल डोंबिवली यांच्या सहकार्याने महिलांची आरोग्य तपासणी विशेषतः कँसर बाबत करण्यात आली.या शिबिरात हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट पनवेलतर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर सुध्दा घेण्यात आले.

        या शिबिरात  कुणबी समाज संघटना मुरबाडचे अध्यक्ष गणपत विशे तात्या,तालुका वैद्यकीय अधिकारी बनसोडे,.सदानंद मोरे,वसंत लीला वुमेन्स वेलफेअरचे अध्यक्षा मनिषा कोल्हे, प्रकाश पवार ,विनायक दळवी,मंगल निमसे,राम दळवी,विनायक मुरेकर,काशिनाथ दळवी उपस्थित होते. या शिबिरात ९० महिलांची कँसर तपासणी एम्स हॉस्पीटलचे कँसर  तज्ञ डॉ .निमेश लोध व डॉ. दिपाली लोध यांनी केली व लक्ष्मी चारिटेबल ट्र्स्टचे डॉ..पाटील यांनी एकूण २२० रुग्णांच्या डोळे तपासणी करुन ८० रुग्णाचे मोफत ऑपरेशन करुन देण्यात येणार आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *