टाकळी हाजी येथे हळदी कुंकू समारंभास हजारो महिलांची हजेरी – सुनीता व मनीषा गावडे यांच्याकडून उत्कृष्ट आयोजन 

365

    शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी शनिवारी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता गावडे आणि शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगलेल्या हळदीकुंकू समारंभात सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील यांनी महिलांशी संवाद साधत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रंगत भरली. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच या भागातील महिलांना सुनिता गावडे व मनिषा गावडे यांनी गावोगाव जाऊन निमंत्रण दिल्याने मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाला गर्दी केली होती. महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाबरोबरच महिलांचे हक्क, आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी किरणताई वळसे पाटील म्हणाल्या की, महिलांनी चुल व मुल या गोष्टी पलीकडे जाऊन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कामाचा ठसा उमटविला असुन, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत आहेत . पालकांनी  मुलीनाही चांगले उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे .  विधवा महिलांनाही समाजाने मान सन्मान देण्याची गरज असल्यांचे प्रतिपादन  किरणताई वळसे पाटील यांनी केले .जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले . या वेळी विधवा महिला तसेच महिला उद्योजिका यांचा सन्मान किरणताई वळसे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामविकास संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे यांनी किरणताई यांचा संस्थेच्या वतीने सन्मान केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले . आभार सविंदणेच्या सरपंच शुंभागी पडवळ यांनी मानले .या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी ही सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील  व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *