जागतिक महिला दिनानिमित्त शिक्रापूर येथे आरोग्य शिबीर संपन्न

77

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : हृदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चाकण चौक शिक्रापूर या ठिकाणी डॉ.मोहित किशोर बोर्डे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे, सरपंच रमेश गडदे, ञिनयन कळमकर, ग्रामपंचायत सदस्या ऊषा राऊत, तानाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते सतीश सासवडे, यशकिर्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई सासवडे व अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले. डॉ.मोहित किशोर बोर्डे, डॉ.आशिष बांगर, डॉ गणेश प्रसाद गिरी,डॉ प्राची बासोळे, डॉ कृष्णकांत साखरे, डॉ ऋषिकेश कवडे, डॉ ईशा जकाते, डॉ किशोर कवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हृदया मल्टीस्पेशालिटी चे डायरेक्टर डॉ मोहित किशोर बोर्डे आणि त्यांचे टीम मेंबर अतुल गुंजाळ,योगिता गुंजाळ,संगीता तावरे,रोहन तावरे,सुमित पवार,शुभम पठारे,हर्षदा जाधव,दीपक राऊत यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. हृदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मधुमेह रक्तदाब,चक्कर, मायग्रेन, डोकेदुखी, मेंदूचे आजार, परेलेसिस, नसांचे आजार, छाती दुखणे, छाती भरणे, हृदयाचा अटॅक, सर्पदंश, विषबाधा, मलेरिया, डेंग्यू, पायाला सूज येणे, दम लागणे, न्युमोनिया, टिबी,सांधेदुखी, हृमेटोईड अर्थराइटीस, कावीळ, लिव्हर सिरॉसिस, पेणक्रियाटाईटीस,किडनीचे आजार,एच आय व्ही, एडस्, आनेमिया,पेशी कमी होणे,ल्युकेमिया व इतर रक्ताचे आजार टायफॉइड व तापाचे आजार या आजारावर उपचार केले जातात.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *