शारीरिक जखमे पेक्षा मनावर झालेली झालेली जखम वेदनदायीच – वसुधा नाईक

401

शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – नित्य व दैनंदिन जीवनात माणसाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात कठीण प्रसंगात संयम राखून जो वाटचाल करतो तो बर्यापैकी समाधान मिळवत असतो. मग जीवन जगताना जखम मग ती मनावरची असो की शरीरावरील असो ती खोलवर रुजते. मनाची जखम असेल तर मन कलुषित करते. कारण आपल्याच माणसांनी,आपल्याच नातेवाईकांनी,आपल्याच मित्राने आपल्या मनाला एक जखम केलेली असते ती शब्दांच्या स्वरूपामध्ये असते. त्याचे शब्द इतके आरपार खोलवर हृदयात रुजतात कि त्याचा खूप विचार केला जातो.मग होत्याचे नव्हते घडते. काही गोष्टी सोडून द्याव्याशा वाटतात. पण मन हे बहिणाबाई चौधरींच्या मन वढाय वढाय किती हाकला हाकला फार येत पिकावर या काव्यपंक्ती प्रमाणे आहे.अनेकदा मन हे दोन्ही बाजूंनी विचार करते. चांगला व वाईट देखील विचार करते. मन कधी भावनेला किंमत देतं तर कधी विचारांना किंमत देत असत त्यामुळे अनेकदा शारीरिक जखमे पेक्षा मनावर झालेली झालेली जखम अत्यंत वेदनदायीच ठरत असल्याचे विचार पुण्याच्या सहकार नगर येथील शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या वसुधा वैभव नाईक यांनी ​सा. समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहेत.

मनावर झालेली जखम जेवढी खोलवर असेल तेवढी भावनांच्या विचाराने तिला खतपाणी घातले जाते आणि समोरच्या माणसाबद्दल आपले मत वाईट होते. त्यासाठी शब्द नेहमी आपण जपून वापरावेत. जसे आपण विचार करतो तसे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात. त्यासाठी समोरच्या माणसाचे आपण मन दुखवू नये आणि समोरच्या माणसाने आपल्या मन दुखावले तर ताबडतोब संवाद करून त्याच्या मनात निर्माण झालेले कुलशीत विचार बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न करा व शक्य होत तेव्हढे त्याच्याशी गोड राहण्याचा प्रयत्न करा असे नाईक म्हणाल्या.

             कारण एकदा मनाला जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. ती बरी व्हायला काही काळ उलटावा लागतो. मग काही दिवस असतील, काही महिने असतील,काही वर्ष सुद्धा जाऊ शकतात. यासाठी कोणाचे मन दुखवुन त्याच्या मनाला जखम करू नये.आणि आपल्या मनाला झालेली जखम सु संवाद करून शक्य होईल तेवढ्या लवकर मिटवून टाकावी.आता शारीरिक जखमे बद्दल बोलायचे ठरवले तर आपण चालता चालता अचानक ठेच लागली तरी आपल्याला जखम होते. झालेली शारीरिक जखम बरी व्हायला सुद्धा काही दिवस द्यावे लागतात. मुलं खेळताना अचानक पडतात. जखम होते. लवकर बरी होत नाही. तर अशावेळी सुद्धा आपण आपला तोल सावरून आपण पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेत झालेली जखम चिघळू न देता त्या जखमेवर ताबडतोब इलाज ज्या प्रमाणे करतो व काही कालावधीतच ती जखम लवकर कशी बरी होईल या करीता उपचार घेतो व जखम लवकर बरी होते.
ज्याप्रमाणे माणूस चांगले विचार व समोरच्या व्यक्तीच्या मनावर आघात होईल असा संवाद न करता हसतमुख भावनेतून बोलून मनाची जखम बरी करू शकतो.तसे शरीराची जखम पूर्ण करण्यासाठी औषधोपचारांची गरज असते.म्हणून कुणाशीही संवाद साधताना शक्यतो त्यांच्या मनाला जखम होणार नाही याचे भान जर आपण ठेवले तर नक्कीच कटुता,दरी निर्माण होत नाही  तसेच शरीराला जखम होऊ नये यासाठी आपण आपल्या अवयवांमध्ये नेहमीच ताळमेळ राखण्याची नितांत गरज नाईक यांनी व्यक्त केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *