उत्कष्ट कार्याबद्दल पत्रकार सुभाष शेटे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर – युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्याकडून दखल 

433
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – मागील १५ ते २० वर्षांपासून आपल्या लेखणीतून विविध सामाजिक प्रश्नांची समाजमाध्यम व विविध वृत्तपत्रातून मुद्देसूद मांडणी करीत सोडवून व्हावी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे तसेच युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून एकच वर्षात पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट संघटन वाढ व सुयोग्य मार्गदर्शन करणारे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील जेष्ठ पत्रकार,कुशल संघटक तथा युवाक्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रसिद्धीप्रमुख,वरिष्ठ मार्गदर्शक    प्रा.सुभाष शेटे यांना भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेली युवाक्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेच्या वतीने ते संघटनेच्या माध्यमातून करीत असलेल्या उत्कृष्ट संघटन,मार्गदर्शन कार्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी आज एक जुलैला शेटे अण्णा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ही सूर्यवंशी यांनी केली आहे. 
          आज पर्यंत कवठे येमाई परिसरासह शिरूरच्या पश्चिम भागातील हजारो लोकांच्या विविध समस्या विनाशर्त सोडविण्याचे व अडचणीत असलेल्या लोकांना मदत मिळवून देण्याचे काम पत्रकार शेटे अण्णा करीत आहेत. युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून ही केवळ एकाच वर्षात पत्रकार शेटे शिरूर तालुक्या सह पुणे जिल्ह्यात संघटन वाढ व मार्गदर्शन करण्याचे काम उत्कृष्टपणे करीत आहेत.त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना आज दि. १ जुलैला युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक व सन्मानपूर्वक शेटे अण्णा यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.  
         पत्रकार शेटे अण्णा यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबाबद्दल राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,नाना महाराज कापडणीस ,पदाधिकारी डॉ. राजेश्वर हेंद्रे,जयश्रीताई अहिरे,शिवाजीराव शेलार,सुरेश गायकवाड,अंकुशराव आगरकर,संगीता रोकडे,वैशाली बांगर,मीना गवारे,मंगल सासवडे,अंकुश घारे,विलास रोहिले,पुणे जिल्हा व शिरूर तालुक्यातील संघटनेचे विविध पदाधिकारी व सदस्य तसेच कवठे येमाई ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.  
 – सुभाष शेटे,९९७५६७४२८६



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *