मुरबाड,ठाणे : मुरबाड नगरपंचायत प्रशासनाला मनसेच्या गणेशोत्सोवानिमित्त अनोख्या शुभेच्छा, मुरबाड शहरातील समस्यांचा बॅनर लावून शुभेच्छा देत केला गांधीगिरीने पर्दाफाश

1411
          मुरबाड,ठाणे : राज्यभर उद्या पासुन गणेशत्सोव सुरु असताना गणेशोत्सोवाच्या शुभेच्छाचे बॅनर  झळकत आहेत.  मात्र मुरबाड मध्ये मनसेने गांधीगिरी करत नगरपंचायती समोर एक आनोखे बॅनर लावुन नगरपंचायत प्रशासनाला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देत नागरिकांसमोर नगरपंचायत कामाचा पर्दा फार्श केला आहे .
          मुरबाड शहरातील काही समस्याबाबत मुरबाड मनसेने मागिल महिन्यात भर पावसात नगरपंचयती समोर धरणे आंदोलन केले होते. त्यावर नगरपंचायतीने लेखी उत्तर देवुनही  समस्या न सुटल्याने  मुरबाड मनसेने अनोखे बँनर लावुन शुभेच्छा दिल्या आहेत. या बँनर वर नगरपचायतीने मुख्य रस्त्यात बसवलेले धोकादायक विजेचे पोल, महिलांसाठी शौचालये बनवण्यात आलेले अपयश,  पार्किंग  व्यवस्था करण्यात आलेले अपयश,  फुटपाथ मोकळे करण्यास आलेले अपयश, स्वच्छ व सुंदर मुरबाड बनविण्यात आलेले अपयश, शहरविकास नियोजन व्यवस्था – मोठा शुन्य, तर अनधिकृत बाधकामात स्पेशल – यशस्वी, असे आनोखे  बँनर लावुन नगरपंचायतीचा कारभाराचे पितळ उघडे करत नगरपंचायत प्रशासनाला गणेशोत्सोवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . याबाबत मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यानी नगरपंचायतीने आंदोलन कर्त्याना लेखी आश्वासन देवुनही कुठल्याही अश्वासनाती पुर्तता न केल्याने आम्ही ह्या शुभेच्छा देत नगरपंचायतीचा कारभार जनते समोर मांडत असल्याचे सा. समाजशीलशी बोलताना सांगितले.
प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *