मुरबाड,ठाणे : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू,मुरबाड मधील म्हसा-धसई रस्त्यावर खेवारे गावाजवळील घटना

941
           मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा धसई रस्त्यावर खेवारे गावच्या हद्दीत काल रविवारी सायंकाळी  गाडी क्र  महा. 04 जी ई 3088 या वेरणा कारने पायी चालणाऱ्या पिंट्या मुकणे यास धडक दिल्याने तो जागीच मृत पावला.  मात्र या घटनेने पायी चालनेही कठीण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.  तर वेगावर नियंत्रण नसणारे चालक असे जीव घेताना दिसत आहेत.
   याबाबात सविस्तर वृत्त असे कि, पिंट्या मुकणे वय २२ हा खेवारे गावाकडुन एकलहरेच्या  दिशेने पायी जात असताना भरधाव येणाऱ्या वेरणा कारने त्याला  धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. पिट्या मुकणे हा जायगाव येथे पायी चालला होता.तर तो याच परिसरातील कोळोशी गावचा रहिवासी आहे.  एेण गणपती उत्सवात गावातील तरुणाचा मृत्यु झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.  टोकावडे पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल  केल्याचे सांगितले.
– प्रतिनिधि:-जयदीप अढाईगेे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *