शिरूर,पुणे : विशेष मुलांची शाळा असलेल्या शिरूरच्या आकांशा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन शिरूर पोलिसांची भेट, मुलांसोबत गप्पागोष्टीतूनव संगीत खुर्ची खेळत लुटला आनंद

840
       शिरूर,पुणे :  शिरूर तालुक्यात रामलिंग रोडवर विशेष मुलांसाठी सुरु असलेल्या आकांशा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन या शाळेस आज शिरूर पोलिसांच्या टीमने भेट दिली. पोलिसमामा शाळेत आल्याचे पाहून मुलांना खूपच आनंद झाला.त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
 
   शाळेच्या संचालिका राणीताई चोरे यांनी स्वागत केले. यावेळी शिरूरच्या पोलीस पथकातील सहकाऱयांनी या विशेष मुलांबरोबर गप्पागोष्टी करतानाच त्यांचे समवेत संगीत खुर्ची खेळत आपल्या बालपणीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. तर पोलिसमामा आपल्या समवेत संगीत खुर्ची खेळताना पाहून या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एकंदरीत शिरूर पोलिसांनी या विशेष मुलांच्या शाळेस भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या वेळी शिरूर पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास घोडके, पोलीस उपनिरीक्षक पालवे, महिला दक्षता कमिटीच्या शोभनाताई पाचंगे,पोलीस नाईक औटी,पोलीस कॉन्स्टेबल खोडदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना खाऊ वाटप करून या विशेष मुलांसमवेत संगीत खुर्ची खेळून आनंद लुटला.
– प्रा. सुभाष शेटे,(सा.समाजशील,शिरूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *