कवठे येमाई, पुणे : कवठे येमाईत मोहरम सण उत्साहात साजरा, गावातून ताबूताची सवाद्य मिरवणूक

813

          कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुक्यातील  कवठे येमाई येथे आज शुक्रवार दि. २१ रोजी मुस्लिम बांधवांनी मोहरम सॅन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने आज आकर्षक सजविलेल्या ताबूताची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या मोहरम सणाचे सर्वत्रच दर्शन घडत असते. असं व हुसेन यांच्या बलिदाना प्रित्यर्थ मुस्लिम बांधव हा सॅन सर्वत्र साजरा करीत असल्याचे कवठे जामा मशिदीचे मौलाना अब्दुल रजाक  यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.

           आज सायंकाळी सहाच्या सुमारास येथील ऐतिहासिक राजवाड्यापासून ताबूत मिरवणुकीस सुरुवात झाली. नूरखान पठाण व त्यांचे बंधू ताबूत बनविण्याचे काम परंपरेने गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. तात्पुर्वी १० दिवस अगोदर या ताबूतांची येथील मशिदीमध्ये विधिवत स्थापना करण्यात आली.  मोहरम निमित्त आयोजित येथील मिरवणुकीत हिंदू धर्मीय देखील सहभागी झाले होते. पत्रकार सुभाष शेटे,पत्रकार शरीफ मोमीन, गणेश रत्नपारखी, मिठूलाल बाफणा,माजी प्राचार्य रशीद मोमीन, अब्दुल रहेमान  तांबोळी, शब्बीर मोमीन,अकबर मोमीन, विजय रायकर, नूरमहम्मद पठाण व कुटुंबीय व अनेक हिंदू मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान ताबूताला भाविकांनी श्रद्धेने खारीक -खोब-याचे  तोरण बांधले होते.या वेळी आकर्षक सजविलेल्या ताबूताची गावातून हनुमान मंदिर,काळे आळी ,बाजार तळ  मार्गे दत्त मंदीराकडे मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी साडेसातला ताबूतांचे विसर्जन करण्यात आले. सर्वांना प्रसाद म्हणून रोट वाटण्यात आले. मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली.

– देवकीनंदन शेटे,(संपादक,समाजशील न्यूज नेटवर्क)  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *