शिक्रापूरच्या दोन विद्यार्थ्यांची तायक्वाँदो स्पर्धेत निवड

567

शिक्रापूर ता. शिरूर येथील विभागीय पातळीवर निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.

शिक्रापूर, पुणे : शिक्रापूर ता. शिरूर येथील विद्याधाम प्रशाला शिक्रापूर या महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेतून विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य नरेंद्र व्यवहारे व उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी दिली आहे.

                    शिक्रापूर ता. शिरूर येथील विद्याधाम प्रशाला शिक्रापूर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी झालेल्या तालुकास्तरीय तायक्वाँदो कराटे स्पर्धेत यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले होते, त्यांनतर नुकत्याच नर्हे ता .हवेली या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिक्रापूर मधील एकूण 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी श्रेयश शिवाजी कर्डिले व ओम युगेश सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्या दोघांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तर प्रणवी कोईगडे, शिवम कांबळे, ओमकार जगताप यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून आकांक्षा लोखंडे व पंकज लोखंडे यांनी तिसरा क्रमांक मिळाला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक बारकू येवले, नानासाहेब गावडे, डी. पि. थोरे यांनी मार्गदर्शन केले. असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे, उपप्राचार्य रामदास शिंदे, पर्यंवेक्षक बाबुराव कोकाटे यांनी दिली. तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमारजी बोरा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश बोरा आणि संस्थेचे सचिव तु. म. परदेश यांनी अभिनंदन केले आहे.

– प्रतिनिधी, शेरखान शेख (सा.समाजशील, शिक्रापूर )

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *