कवठे येमाई,पुणे : मलठण ता.शिरूर येथे जादूटोणा केल्याचा प्रकार उघड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जादूटोणा साहित्य जाळले, नागिरकांनी घाबरून न जाण्याचे अंनिस सह शिरूर पोलिसांचे आवाहन

733

 कवठे येमाई,पुणे : मलठण ता.शिरूर येथील ओढ्यालगत जादूटोणा केल्याचा प्रकार काल दि. २३ ला उघडकीस आला. या घटनेवरून अजूनही अंधश्रद्धेतून  ग्रामीण भागात भानामती व जादूटोणा व अघोरी दुष्क्रुत्ये करून  नागरीकांना घाबरविण्याचे प्रकार सुरु असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.जादूटोणा सारखी अघोरी कृत्ये करून माणसांवर कोणताही दुष्परिणाम होत तर नाहीच पण विकृत वृत्तीच्या व्यक्तींकडून अशी ही जादूटोणा सारखी मानसिक त्रास देणारी कृत्ये होत असताना पाहावयास मिळत असते अशा प्रकारांना पायबंद  घालण्यासाठी समाजातील विविध स्थरातील  नागरीकांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढे येन्याची  गरज असल्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केले.

  

शिरूर तालुक्यातील मलठण येथील ओढ्याजवळ झाडावर काळ्या बाहुल्या, टाचण्या व काही नागरीकांच्या नावाची चिठ्ठी लिहून त्यावर रक्ताचे डाग असलेली पिशवी टांगण्यात आली होती.काही नागरिकांना हा जादूटोण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिंदेवाडी येथील ग्रामस्थ सतीश शिंदे यांनी आमचे कवठे येमाई येथील प्रतिनिधींना या बाबत माहिती दिली. त्यांनी त्वरेने सर्वप्रथम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांना या प्रकाराची माहिती दिली असता त्यांनी पुणे अंनिस च्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांना याबाबत कळविले. असता त्या काल दि. २३ ला तातडीने सकाळीच मलठण ला पोहचल्या. त्यांनी या प्रकाराची माहिती घेत जादूटोण्यासाठी वापरण्यात आलेले लिंबू,मिरच्या,काळ्या बाहुल्या व इतर साहित्य गोळाकरून सर्वांसमक्ष जाळून टाकले. या वेळी या प्रकाराने घाबरलेल्या नागरीकांना जादूटोणा निर्मूलनासंदर्भात प्रबोधनकेले.

पंचायत समिती सदस्य डॅा.सुभाष पोकळे, मलठणचे सरपंच कैलास कोळपे, सोसायटीचे मा.चेअरमन दत्ता गायकवाड, अंनिसच्या शिरूर तालुका कार्याध्यक्ष चेतना ढमढेरे, डॅा. पार्वती कदम, सामाजिक कार्यकर्ते  सतीष शिंदेव इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी अंधश्रद्धा विषयक प्रभोधन करताना पुढे म्हणाल्या कि,  जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शनास आलेली जादूटोण्यातील नारळ, लिंबू आम्ही सर्वांसमक्ष खाऊन दाखविलेले आहेत व आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. मात्र  असे प्रकार जागृत नागरिकांनी  उघडीस आणले पाहिजेत .अशा प्रकरणातून एखादा  नरबळी सारखा प्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंध करणे गरजेचे आहे. असे प्रकार करणाऱ्यावर जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हे देखील दाखल होऊ शकत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

तर मलठण येथील जादूटोणा प्रकार झाल्याची  माहिती मिळताच आज दि. २४ ला शिरूर पोलिसांचे पथक मलठण येथे भेटीस आले होते. पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक घोंगडे व पोलीस कर्मचाऱयांनी घटना स्थळी भेट देत अशा घटनांमुळे  नागरिकांनी घाबरून जाऊ नये,जरूर पडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. तर सरपंच कैलास कोळपे यांनी या जादुटोणा प्रकारातील सहभागी लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

–  प्रा. सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *