नीरा नरसिंहपूर,इंदापूर : पिंपरी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न,लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात विविध कार्यक्रम

681

          नीरा नरसिंहपूर,इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन लालासाहेब शिवाजी बोडके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन जनगनमन व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  शालेय विद्यार्थ्यांनी कवायतिचे विविध प्रकार करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तर यावेळी विद्यार्थ्यानी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन दादा बोडके हे होते.

            यावेळी स्वर्गीय लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या प्रतिमेचे पूजन पिंपरी बुद्रुक गावचे खंबीर नेतृत्व व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक सरचिटणीस श्रीकांत बापू बोडके यांनी केले. यावेळी अनंता आबा बोडके, बबन दादा बोडके, लालासो बाबा बोडके, सरपंच आबासाहेब बोडके, उपसरपंच जाहीर आभिषेक, समाधान बोडके, हिरालाल सूळ, बाळासाहेब घाडगे, दादासाहेब शेख, संतोष सुतार, तुकाराम बोडके, तुकाराम मगर, वर्धमान बोडके, चांगदेव बोडके, प्रवीण बोडके, बाळासाहेब पडळकर नबिलाल शेख, दिलीप ढोकळे, हनुमंत पडळकर ,बाबुराव रंधवे, शरद बोडके,नामदेव बोडके,चांद शेख,मुख्याध्यापक पाडुळे,सर्व शिक्षक, विद्यालयातील कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
  – प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर,इंदापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *