टाकळी हाजी,शिरूर : शिरूर तालुक्यातील पाणी टंचाईने तहानलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक एकवटले;पाणी साठवणीसाठी २५ पाण्यांच्या टाक्या देऊन लावला हातभार

510
         टाकळी हाजी,शिरूर : शिरूर तालुक्यातील पाणी टंचाईने तहानलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक एकवटले असुन, त्यांनी २५ पाण्यांच्या टाक्या साठवणीसाठी देऊन हातभार लावला आहे.सर्व शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून या टाक्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत.
         शिरूर तालुक्यातील केंदुर, पाबळ, मिडगुलवाडी, धामारी,खेरेवाडी, खैरेनगर, या गावांमधे सध्या तिव्र पाण्याची टंचाई भासत असुन, शासनाच्या वतीने १८ टॅक्टरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी साठविण्यासाठी टाक्यांची आवश्यकता होती. गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी शिक्षक संघटनेचे प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना मदतीचे आव्हान केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे, शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष शहाजी पवार, संघाचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, समितीचे तालुका अध्यक्ष सतिश नागवडे, अखिल शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमेश थोरात, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टिळेकर, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सतिश पाचर्णे,यांच्यासह शिक्षकांनी प्लास्टीक टाक्या घेऊन देण्याचा निर्धार केला. त्यांनी सर्व शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून या २५ टाक्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे सुपुर्द केल्या. या वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर , शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी बी.आर.गायकवाड, संजय शिंदे उपस्थित होते.
           या वेळी गटविकास अधिकारी संदीप जठार म्हणाले की, पाणी टंचाई प्रसंगी शिक्षकांनी आव्हानाला प्रतिसाद देऊन, मोठ्या मनाने जी मदत करून राज्यात आदर्श निर्माण करून , तालुक्यांचे नाव उंचावले आहे. समाजातील सर्वच स्तरामधुन अश्या प्रकारे नैसर्गिक आपत्तीला धाऊन जाण्यांची भारतीय संस्कृती असुन, त्यांचे दर्शन येथे झाले आहे. शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे म्हणाले की, सर्व शिक्षकांनी मोठया मनाने मदतीचा हात दिला असुन, शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे जान सर्व शिक्षकांना आहे.
शिक्षकांच्या या उपक्रमाबददल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
– विशेष प्रतिनिधी,संजय बारहाते,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *