शिक्रापूर,शिरूर : तळेगाव ढमढेरे येथिल लांडेवस्ती जि.प. शाळेमध्ये विविध सास्कृतिक कार्यक्रम संपन्न

925
       शिक्रापूर,शिरूर : तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथिल लांडेवस्ती जि.प. शाळेमध्ये विविध सास्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी स्नेहसंमेल्रनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी Animal Walk  हा आगळावेगळा कार्यक्रम व उत्कृष्ट दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी छोट्या मुलींनी विनोदी उखाणे घेतले,तर महिलांनी उखाणे घेऊन आनंदोत्सव साजरा केला.शाळेच्या मुख्याध्यापिका अलका शिंदे यांनी मा.उपसरपंच उज्वला ज्ञानेश्वर भुजबळ तळेगाव ढमढेरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनिंता भानुदास लांडे (लांडेवस्ती) यांचे व उपस्थित सर्व ग्रामस्थांचे स्वागत केले.कार्यक्रमासाठी मोहन किसन भुजबळ मा.ग्रा.पं.सदस्य,.अण्णासाहेब भुजबळ मा.ग्रा.प.सदस्य,सचिन लोंडे,रेणूका धायरकर, सुरेश धायरकर,नारायणदादा भुजबळ,सत्यवान भुजबळ,शीतल आढाव,उषा चव्हाण,.सरस्वती सिनलकर,अंगणवाडी सेविका ग्रामस्थ ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          सानिका संपत धायरकर( धावणे स्पर्धा व उंचउडी — हरियाणा) गोल्डमेडल मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा,रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले..ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे यांच्यातर्फे शाळेला प्रोजेक्टर E learning किट तसेच बबन धायरकर यांनी शाळेला कपाट भेट दिले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षिका रेशमा शेख,अलका शिंदे,सरस्वती सिनलकर ,शोभा सिनलकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. रेशमा शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व मान्यवरांचे उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.मुलांना ग्रामस्थांनी खाऊवाटप केले.
 – प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *