अलिबाग, रायगड : रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की;एक महीन्याचा अवधी मागितल्याने जप्तीची कारवाई टळली,शेतकऱ्याची हायवे साठी गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने न्यायालयात धाव

566
         अलिबाग, रायगड : मुबंई – पुणा एक्सप्रेस हायवे करीता जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याने खोपोलीतील शेतकरी यांनी कोर्टात धाव घेतली परंतु कोर्टाने आदेशामध्ये ठरवुन दिलेली रक्कम वारंवार मागणी करुनही जिल्हाधीकारी कार्यालयाने न दिल्याने अखेर अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने जप्तीची कारवाई सुरु केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालया कडे एक महीन्याचा अवधी मागितल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की टळली.
या बाबत सविस्तरवृत्त असे की, १९९८ मध्ये खोपोलीतील शेतकरी काशिनाथ दगडु शेडगे यांची जवळ जवळ साडेपाच एकर जमिन मोजे माडप ता खालापुर हद्दीतील मुबंई पुणा एक्सप्रेस वे करीता बधित झाली.  तेव्हा त्यांना शासनाकडुन योग्य मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.  त्याविरोधात सहा महीन्यापुर्वी न्यायालयाने  4 कोटी 25 लाख रु. व्याजा सहीत द्यावेत  असे आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयातुन शेडगे यांना रक्कम अदा करण्यात आली नाही.
       त्याविरोधात अखेर आज दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी कोर्टाच्या आदेशा नुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर कोर्टाचे बेलीफ सह शेडगे यांचे वकिल अँड सचिन जोशी व काशिनाथ शेडगे यांचे कुळमुखत्यार त्याचे सुपुत्र कमलाकर शेडगे हे पोहचले असता जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी कोर्टाकडे रितसर पत्र लिहुन एक महीन्याच्या अवधीत सबंधीतांचे पैसे अदा केले जातील व तसा अवधी कोर्टाकडे लेखी स्वरुपात मागितला.
त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने कशीबशी जप्तीची नामुष्की टाळली असली तरी काशिनाथ शेडगे यांची मुळ रक्कम व्याजा सहीत एकुण सव्वा पाच करोड रुपये देण्याची टागंती तलवार मात्र कार्यालयावर आहे. अन्यथा पुन्हा जप्ती करावी लागेल असे कमलाकर शेडगे यांनी सांगितले.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *