दोंडाईचा,धुळे : बसस्थानक परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणारे खाजगी प्रवासी वाहन हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एस टी बस चालकास मारहाण,या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

530

दोंडाईचा,धुळे : दोंडाईचा एस टी बसस्थानक परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणारे खाजगी प्रवासी वाहन हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरुन संबंधित वाहन चालकासह त्याच्या साथीदारांनी एस टी बस चालकास मारहाण केल्या प्रकरणी चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या घटनेनंतर संतप्त बस चालक, वाहकांनी दोंडाईचा बसस्थानक बाहेर रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम आंदोलन केले. मात्र प्रवाशांना वेठीस धरणे योग्य होणार नसल्यामुळे अर्ध्या तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील बसस्थानक परिसरात दोनशे मीटर अंतरावर वाहने उभी करण्यास बंदी असतांनाही नंदुरबार चौफुरी पासून ते थेट बस स्थानकाच्या परिसरात मुख्य रस्त्यावर दरोरज २०० ते ३०० खाजगी प्रवाशी वाहने उभी करुन प्रवाशी प्रवाशी भरले जातात.अनेकदा प्रवाशी घेण्यावरून या ठिकाणी वाद- विवादाचे प्रसंग घडतात. त्यातच काल सकाळी १० च्या सुमारास दोंडाईचा आगाराची दोंडाईचा-पुणे ही बस नंदुरबार चौफुलीपासून बस स्थानकाकडे येत असतांना वळणावर एक खाजगी प्रवाशी वाहन उभे होते. बस चालक रमेश शिरसाठ यांनी संबंधित वाहन चालकास अळथळा निर्माण झाल्याकारणाने वाहन हटविण्याची सुचना केली. त्यातून त्या चालकास त्याच्या साथीदाराने शिरसाठ यांच्याशी वाद घाटला. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादात दोघांनी रमेश शिरसाठ यांना नाका-तोंडावर बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले. त्यांना तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे बसचालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इतर बसचालक व वाहकांनी स्थानकाबाहेर रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणा दिल्याने परिसर दणाणला होता. घटनास्थळी दोंडाईचा आगार प्रमुख अनुराधा चौरे, वाहतुक नियत्रंण निखिल पाटील, यांनी भेट दिली. सुमारे अर्धातास हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनामुळे प्रवाशी वेठीस धरले जाऊ नयेत म्हणुन आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनीही कारवाईचे आश्वासन दिले आंदोलनात उदय पवार, विजय जाधव, नरेंद्र भाबड, एन.डी गिरासे, संजय फुलपगारे, संदीप निकम यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी दोंडाईचा येथील विश्वासू प्रवाशी संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र गिरासे,सा.समाजशीलचे पत्रकार समाधान ठाकरे पत्रकार सदाशिव भलकार आंदीनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.या प्रकरणी रमेश शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– प्रतिनिधी,समाधान ठाकरे (सा. समाजशील,दोंडाईचा,धुळे)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *