शिक्रापूर,शिरूर : शिक्रापूरच्या राऊतवाडीत श्रीनाथ म्हसकोबा,जोगेश्वरी माता यात्रा उत्सव,भंडारा संपन्न

1106
      शिक्रापूर,शिरूर :  तालुक्यातील शिक्रापूरच्या राऊतवाडीत श्रीनाथ म्हसकोबा,जोगेश्वरी माता यात्रा उत्सव,भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे 5 वा श्री चा अभिषेक व महापूजा सकाळी 9 वा श्रीना हारतुरे व नैवेद्य, दुपारी 12 ते 1 बैलांची मिरवणूक, दुपारी 1 ते 3 संत सावतामाळी भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 4 ते 6 सामुहिक दंडवत, रात्री 8 ते 1 श्री चा छबिना व भविष्यवाणी रात्री 1 ते 5 गुरुदत्त प्रासादिक नाट्य रूपी भजनी भारूड मंडळ ओझरडे यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे  बैलगाडा शर्यती बंद असल्याने गाडा मालक यांनी बैलांच्या काढलेल्या मिरवणुका व पारंपरिक पद्धतीने घातलेले  दंडवत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  आजही शर्यती बंद असल्या तरी आपल्या सर्जा राजाच्या प्रेमापोटी प्रसिद्ध गाडा मालक  तानाजी रामचंद्र राऊत  सीताराम कळमकर  विजय राऊत  मंगेश नामदेव राऊत कुंडलिक राऊत,एकनाथ भाऊसाहेब राऊत,सोमनाथ राऊत, दत्ता राऊत या सर्व गाडा मालकानी मोठया आनंदाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलालाची आणि भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढून देवदर्शन घेतले व बैलगाडा शर्यती चालु होण्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेला साकडे घातले. तसेच राऊत वाडी ग्रामस्थांनी आजच्या काळात एकोप्याने पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे चालत आलेला सामुहिक दंडवत कार्यक्रम ढोल,ताशा,झांजा यांच्या गजरात पारंपारिक खेळ सादर करत मोठ्या आनंदाने पार पाडला. अशा प्रकारे सामुहिक व पारंपरिक वाद्य यांच्या गजरात निघणारी दंडवते आजच्या काळात फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. ही परंपरा जोपासण्याचे काम राऊत वाडी ग्रामस्थ मोठय़ा उत्साहाने करत आहेत. अशाप्रकारे श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा उत्सव मोठ्या आनंदाने पार पडला.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *