पुणे : संगीत म्हणजे नुसते गायन वादन नसुन ही विलक्षण प्रक्रिया – डॉ. राम साठे, हिंदू नवीन वर्षाच्या प्रारंभदिनी नितिन आवेकर यांच्या जाम रूमचा प्रारंभ

498

          पुणे : संगीत म्हणजे नुसते गायन वादन नसुन ही विलक्षण प्रक्रिया असून संगीताचा वारसा जतन करतानाच नव्या पिढीच्या संगीत कलेला प्रोत्साहन असल्याचे प्रतिपादन डॉ. राम साठे यांनी केले. नुकतेच ते शनिवार पेठेतील मुरलीधर अपार्टमेंट मध्ये गुढी पाडवा अर्थात हिंदू नवीन वर्षाच्या प्रारंभदिनी नितिन आवेकर आयोजित जाम रूमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

   यावेळी  डॉ . राम साठे यांच्या हस्ते श्री शारदेचे पुजन व दिप प्रज्वलन करून या जाम रूमचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. राम साठे यांनी संगीत क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या नव्या पिढीतील ऋषिकेश आवेकर व यशराज आवेकर यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. जाम रूम हे नावच तरूणाईचे निदर्शक असुन नविन पिढी हे सार्थ करेलच याची खात्री त्यांनी व्यक्त केली .

    समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकांचा संदर्भ देऊन डॉ. राम साठे यांनी शरीर शास्त्राच्या आधारे वाणीचे पाच प्रकार व त्यांची उगमस्थानापासुन शब्दरूपाने मुखातुन बाहेर पडण्यापर्यंतची प्रक्रिया उपस्थितांना अतिशय प्रभावीरित्या समजावून सांगितली. त्यांच्या सुमधुर वाणीने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले.संगीत म्हणजे नुसते गायन वादन नसुन ही विलक्षण प्रक्रिया आहे अशी जाणीव उपस्थित तरुणाईच्या आश्चर्यचकित मुद्रांवरून जाणवत होती. अतिशय सुसज्ज सर्व वादयांनी प्रशस्त अशा या जाम रुमची निर्मिती निमिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.यशराज, मोहनीश व अर्णव यांनी यावेळी अतिशय सुरेल वादन करीत उपस्थितांची मने जिंकली.

– प्रतिनिधी,श्रुती भालेराव,(सा.समाजशील,पुणे)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *