मुरबाड,ठाणे : पेट्रोल डिझेल च्या दरवाढीने ग्रामिण भागातील नागरिकांची धमछाक, रोजंदारी पेक्षा खर्च वाढल्याने सरकार आमची चेष्टा करते कि काय ? असा कष्टकऱ्यांचा सवाल

393
            मुरबाड,ठाणे : देशात सर्वत्र रोजच पेट्रोल, डिझेल चे दर वाढत असल्याने ग्रामिण भागातील नागरिकांची धमछाक झाली असुन रोजंदरी पेक्षा खर्च वाढल्याने सरकार आमची चेष्ठा करते काय ? असा सवाल नागरिक करत आहेत.
मुरबाड औद्योगिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात कामगार वर्ग असुन ग्रामिण व दुर्गम भागातील तरुण वर्ग कामासाठी  येतात. वेगवेगळ्या वेळेस कंपनीचे कामाची वेळ असल्याने मोटरसायकलचा  प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतो. मुरबाड औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारी असल्याने मिळणारा पगार हा शासनाने ठरवुन दिलेल्या किमान वेतना पेक्षा कमी असल्याने रोंजदारी पेक्षा खर्च वाढल्याने सरकार आमची चेष्ठा करते काय ? असा सवाल केला जात आहे.  सरकारच्या धोरणा नुसार गरिबी हाटविल्याची खात्री झाल्याचा अनुभव लोक सांगत असुन ईंधन वर चालणारी वाहने एपती नुसार प्रत्येका कडे असुन गरिबा पासुन सर्व श्रीमंताना पेट्रोल व डिझेल चा वापरा शिवाय पर्याय नसुन कमाई कितीही असो मात्र एकाच भावाचे ईंधन भरण्याची ताकद सर्वामंध्ये आल्याने गरिबी हटविल्याची चेष्ठात्मक  उत्तरे नागरिक देत आहेत. विरोधी पक्षाच्या आंदोलना नंतरही  पेट्रोल डिझेल चे दर रोज वाढत असल्याने नागरिकचिंतेत असुन 200 रुपये मिळवण्यासाठी 90 रुपये किमतीचे पेट्रोल कसे टाकावे ?  हा प्रश्न भेडसावत असताना रोजगारातील वेतन ही वाढले पाहीजे अशी मागणी करताना  आमदार, खासदार ,नामदार, सरकारी अधिकारी,यांच्या गाड्यातील इंधन सरकार भरते त्यामुळेै  त्याची झळ त्यांना  बसत नसल्याने  आम जनतेने  कसे जगावे  ? असा सवाल कष्टकरी जनता करत आहे.  त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
– प्रतिनिधी, जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *