नीरा नरसिंहपूर,इंदापूर – पिंपरी बुद्रुक येथील पायी कावड यात्रा शिखर शिंगणापूरला दाखल, राज्यभरातून लाखो भाविकांचा शंभू महादेवाच्या दर्शनासाठी महापूर

939
         नीरा नरसिंहपूर,इंदापूर – (बाळासाहेब सुतार) : महाराष्ट्रा सह इतर राज्यातून शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली. यावेळी भाविकांनी शिखर शिंगणापूर येथे आणलेल्या कावडींचा महापुर  दिसून येत होता. लाखो भाविक भक्त आप आपल्या भागातून महादेवाची कावड सजवून शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी घेऊन आले होते. विविध  वाद्यांच्या गजरात व गुलाल उधळत भाविक-भक्त रंग खेळण्यात डांग झाले होते.  राज्याच्या कानाकोपऱ्यातून  भाविक शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी गुढी पाडव्यापासून सजविलेल्या कावडी सह पायी वारी वाजत-गाजत सुरु करीत असतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील शंभू महादेवाची कावड भाविक भक्तांनी शंभू महादेवाचा जयघोष करीत, वाजत गाजत शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेस गावातून प्रारंभ केला होता. शिखर शिंगणापूर येथे जाणाऱ्या कावड सोहळयात पिंपरी बुद्रुक येथून भाविकांचा मोठा सहभाग होता. सहभागी भाविकभक्तांचा आनंद ओसंडून वाहात होता. कावड सोहळा शिखर शिंगणापूरला पोहचल्या नंतर गावातून कावड प्रदक्षिणा होऊन त्या ठिकाणी महाप्रसादाची सर्वांनाच सोय करण्यात आली होती. पिंपरी आणि पिंपरी परिसरातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने शिखर शिंगणापूर कावड यात्रेत सहभागी झाले होते. इंदापूर तालुक्याच्या  इतरही भागातुन शिखर शिंगणापूर यात्रेसाठी कावडी दाखल झाल्या होत्या. तेथील यात्रा संपल्यानंतर पिंपरी बुद्रुक व इंदापूर तालुक्यातील इतर गावातील भाविक भक्त परतीच्या मार्गाला निघाले आहेत.
– प्रतिनिधी,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर,इंदापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *