झरी,यवतमाळ : रक्ताची गरज असलेल्या गरोदर मातेला रक्त देण्यासाठी कडक उन्हामध्ये त्यांनी केला ५१ किलोमीटरचा प्रवास,विदर्भातील मुकुटबनच्या प्रियल पथाडेकडून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय

551
       झरी,यवतमाळ : (ब्युरो रिपोर्ट) : रक्ताची गरज असलेल्या गरोदर मातेला रक्त देण्यासाठी अत्यंत कडक उन्हामध्ये प्रियल पथाडे व त्याच्या मित्राने चक्क ५१ किलोमीटरचा प्रवास करीत त्या गरोदर मातेला रक्तदान करीत समाजात माणुसकी आज ही जिवंत असल्याचा प्रत्यय दिला आहे.
    आपल्या रक्तदानामुळे एखादा जीव वाचत असेल तर नक्कीच आपण  कोणासाठी तरी जिवनदाता आहोत.व्हाट्सएप गृपद्वारे रक्तदाते उपलब्ध करून देणाऱ्या तेलंगणातील राजीव गांधी सरकारी रूग्णालय आदीलाबाद येथे भरती असलेल्या  प्रिया महेंद्र आगरकर या गरोदर मातेला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच रक्तविर बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांनी तात्काळ त्या मातेच्या रक्तगटाशी जुळणारा रक्तदाता प्रियल पथाडेच्या रूपाने उपलब्ध करून दिला. सोशल मिडीयाच्या युगामध्ये व उन्हाच्या चटक्याने कुलर ए.सी. च्या थंड हवेत आराम करणारे युवक आज विदर्भात अनेक ठिकाणी दिसतात.
      तापमान जवळपास ४४ च्या आसपास असतानाही  यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकूटबन येथील प्रियल पथाडे व राजुर येथील धम्मा भोवरे हे दोघे दुपारच्या अत्यंत कडक उन्हाचे चटके झेलीत ५१ किलोमिटरचा प्रवास दुचाकीवरून करून थेट तेलंगणा राज्यातील आदीलाबादचे सरकारी रूग्णालय गाठले. ब्लड बँकेत जाऊन प्रियलने रक्तदान करीत गरोधर माता प्रिया महेंद्र आगरकर यांची भेट घेतली. प्रियल व त्याच्या सहकाऱयांनी आजपर्यंत अनेक गरजु गरीब रुग्णांना विनामूल्य रक्तदाते मिळवून दिले आहेत.  तर आज त्याने स्वतः रक्तदाता बनुन समाजापुढे एक आदर्श व उल्लेखनीय कार्य ठेवले आहे. रक्तदान क्षेञात उल्लेखनिय कार्य केल्यामुळे रक्तविर बहुउद्देशीय संस्था व तेथील प्रफुल भोयर, गणेश मुद्दमवार, गोकुल जुमनाके, स्वप्नील अलगदेवे, जयंत उदकवार यांचा  अमरावती रक्तदाता संघटन, एड. वैशाली डोळस, सोच ब्लड गृप इंदौर (मध्य प्रदेश), यांचेकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
(सा.समाजशील,झरी,यवतमाळ)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *