दिघी,पुणे : आमदाबाद येथील जळीतग्रस्त कुटुंबाच्या मदतीला शिरूच्या तेजस्विनी सरसावल्या,शिधा व संसार उपयोगी साहित्याची केली मदत

659
       दिघी,पुणे (गणेश थोपटे) : आमदाबाद ता.शिरूर येथील भिल्ल्ल वस्तिवर लागलेल्या आगीत 5 झोपड्या आगीत जळून ख़ाक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत एक 35 वर्षांचा तरुण  2 लहान मूले यांचा होरपळून मृत्यु झाला होता. या जळीतग्रस्त ५ कुटुंबाचे संसार साहित्य या घटनेत पूर्ण खाक झाले व ही कटुंबेच उघड्यावर पडली.
   सामाजिकतेची जाण असणाऱ्या शिरूरच्या तेजस्विनी फाउंडेशनच्या महिलां व कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाना मदत म्हणून गहु,तांदूळ,किराणा साहित्य,कपड़े व् इतर ही प्रापंचीक गरजेच्या अत्यावश्यक वस्तू व  सर्व लोकांना जेवण असे सर्व साहित्य आमदाबाद येथील भिल्लवस्तीवर स्वतः घेऊन जात या पिडीत कुटुंबांची आस्थेने चौकशी केली. व आणलेली सर्व मदत या ५ ही कुटुंबाना दिली. तेथील वास्तव व विदारक चित्र पाहुन सर्वांच्या डोळ्यात पानी आले. तेथे त्यांना खुपच भयानक परस्थिती पाहावयास मिळाली. शिरूरच्या तेजस्विनी फाउंडेशनने केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे.
यावेळी फाउंडेशनच्या वैशाली चव्हाण,सुलताना शेख,अनघा पाठक,ज्योती शेलार,पुष्पा सूर्यवंशी,सविता लाटे,तृप्ति मोकळे,अपूर्वा चव्हाण,शीतल कातोरे,ज्ञानदेव चव्हाण;अतुल पाठक,सचिन मोकळे उपस्थित होते.
– विशेष प्रतिनिधी,(सा.समाजशील,दिघी,पुणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *