रायगड,अलिबाग : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील केळवली येथील ३३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू, जिल्ह्यात खळबळ, जिल्हा आरोग्य विभाग सतर्क

598
          रायगड,अलिबाग :  रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील केळवली येथील सौ. वृंदा संतोष दिसले या  ३३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
           खालापूर तालुक्यातील केळवलीतील रहिवासी सौ. वृंदा संतोष दिसले  वय ३३ या मागील ३ दिवसापासुन तापा मुळे आजारी होत्या. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचेवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने दिसले यांचा मृत्यू झाला. या घटनेने केळवली सह खालापूर तालुक्यात एकाच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण  निर्माण आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आज सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक केळवली गावात दाखल झाले. या पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मच-यांनी गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी व  परिसराची पहाणी करून योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगितले.
           सौ. वृंदा संतोष दिसले ह्या रायगड जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यु चा यंदाच्या मोसमातील पहिल्या बळी ठरल्या आहेत. या घटनेने  जिल्ह्यातील आरोग्य यत्रंणा ही सतर्क झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शहा यांनी केळवली गावाला भेट देऊन गावकरी व नातेवाईकांना योग्य ती खबरदारी व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *