निघोज,पारनेर : मारूती फकीरा गायकवाड

निघोज,पारनेर : स्मृतीभ्रंश झाल्याने निघोज मधून ९० वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता, आढळ्यास संपर्क साधण्याचे गायकवाड यांचे आवाहान

537
          निघोज,पारनेर : पारनेर तालुक्यातील निघोज येथून मारूती फकीरा गायकवाड वय ९० हे वयोवृद्ध गृहस्थ दि. १३ रोजी दुपारी एक वाजता निघोज शिरूर रस्त्यानजीक चालले असताना स्मृतीभंश झाल्यामुळे अचानक हरवले आहेत. याबाबत त्यांचा मुलगा सुनिल मारुती गायकवाड यांनी आज दि. १४ रोजी पारनेर पोलीस स्टेशन येथे वडील गायब झाल्याची फिर्याद दिली आहे. गायकवाड हे गाव व परिसरात कोठे तरी असतील याची त्यांच्या घरच्यांना खात्री आहे.  वय झाल्याने कधी कधी त्यांना विस्मरण होते.  कृपया मारुती गायकवाड हे कुणाला आढळल्यास कृपया वैभव खोमणे मो. नं. 7972767089, तसेच दत्तात्रय गायकवाड  9637440551 या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन गायकवाड बंधू यांनी केले आहे.
– ब्युरो रिपोर्ट,(सा.समाजशील,निघोज)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *