शिक्रापूर,शिरूर : विद्याधाम प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, ८ वी चे ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले

693
      शिक्रापूर,शिरुर : तालुक्यातील शिक्रापूरच्या  विद्याधाम प्रशालेतील  इयत्ता ८ वी चे ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यात विद्यालयारील भुजबळ तेजल श्रीकांत (२२२ गुण),राठोड शितल राजेश (२१२गुण),गोसावी रेणुका केवलगीर (२००गुण),कुंभार आदिती अशोक (१९४ गुण),चव्हाण शिवम अप्पाजी (१९२गुण),मोरे मोहित चंद्रगुप्त ( १९० गुण), यादव जान्हवी कुंदन (१९० गुण), भुजबळ संकेत सुनिल(१८४ गुण), टिक्कल प्रज्वल किशोर (१८२ गुण), लडकत आदित्य राजेंद्र (१८० गुण), भुजबळ सेजल श्रीकांत (१७२ गुण) या विद्यार्थ्यानी नेत्रदीपक यश संपादित करीत विद्यालयाचे व गावाचे नाव रोशन केले आहे.
   यशस्वी विद्यार्थ्यांना संदीप खटके,संतोष परदेशी, मंगल शिंदे,शाम नाईक,जयश्री कोकाटे,ज्ञानेश्वर कुंभार,गौतम चिकने,किसन गुंजाळ,कृष्णदेव रुपनवर,चिंतामणी कोळी,योगिता पावसे, सुहानी तांबोळी, वैशाली ढवळे इत्यादी शिक्षकांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले .
           यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा,प्रशालेचे अध्यक्ष प्रकाश बोरा,संस्थेचे सचिव तु. म. परदेशी ,संस्थेचे सहसचिव बाबासाहेब चोरमले, प्राचार्य रामदास शिंदे, माजी प्राचार्य नरेंद्र व्यवहारे, उपप्राचार्य रामदास चव्हाण, पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.
– प्रतिनिधी, राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *