पुणे : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते 'टाइम्स पॉवर मॅन अवार्ड' स्वीकारताना प्रा. डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया

पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते ‘टाइम्स पॉवर मॅन अवार्ड (वेस्ट)-२०१९’ प्रदान

545
              पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल टाइम्स ग्रुपच्या ऑप्टिमल मीडिया सोल्यूशन्सच्या वतीने देण्यात येणारा ‘टाइम्स पॉवर मॅन अवॉर्ड’ सूर्यदत्ता ग्रुप ऑफ ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, रेमो डीसौजा, आयुष्यमान खुराना, शैलेश आणि स्वाती लोढा, गीता कपूर, दिव्यंका त्रिपाठी दहिया, निधी मोहन, दालीप ताहिल, नादिरा बब्बर, लिलीत दुबे यांनाही त्याच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
             सूर्यदत्ता ग्रुप ऑफ ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व यंत्रणा उभी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक वाढीसाठी उद्योग संवाद, प्रक्रिया, अध्यापन पद्धती, विद्याशाखा कौशल्ये, शिक्षण संसाधने, प्रेरणादायक सर्जनशीलता यावर संस्थेत भर दिला जात आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा दृष्टीकोन हे सूर्यदत्ता संस्थेचे वैशिष्ट्य आहे. ‘सूर्यदत्ता’मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, आरोग्य व तंदुरुतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामध्ये कराटे, तायक्वांदो यासह इनडूअर-आऊटडूअर स्पर्धा, पॉवर योगा, एरोबिक्स, झुंबा डान्स, मेडिटेशन, आऊटबाउंड ट्रेनिंग, कमांडो ट्रेनिंग प्रोग्रामिंग, बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थ्यांतील सर्वांगीण शक्तीचा विकास व्हावा, या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्र आयोजिले जातात. ब्रेवरी अवार्ड देऊन मुलांना प्रोत्साहित करण्यात येते. त्यातूनच विद्यार्थ्यांतील पॉवर मॅन आणि वुमेन घडतात, असे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
           प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान केला आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरु राहणार असून, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान कसे राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम व आर्थिकदृष्ट्या वंचित घटक, शेतकरी, सशस्त्र सेना सदस्य, लोकसेवक यांचा समावेश आहे. दिव्यांग मुलांना, सीएसआरच्या पुढाकारातुन आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रम, पर्यावरणीय जागरूकता वाढविणे, कॅम्पसमध्ये आरोग्य तपासणी, राष्ट्र एकत्रीकरण कार्यक्रम आदी उपक्रम राबविले आहेत. या सर्व कार्याची दखल घेत टाइम्स ग्रुपने हा सन्मान केला आहे.”



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *