कळंब,आंबेगाव : शासनाचे चुकीचे धोरण शेतकरी व्यापारी वर्गासाठी घातक – दिलीप वळसे पाटील

430

   कळंब,आंबेगाव : (ब्युरो रिपोर्ट) – सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विविध व्यवसायिक आणि शेती आर्थिक अडचणीत सापडली आहे.त्यामुळे बाजारपेठांमध्ये मंदीचे वातावरण पसरले आहे.सरकारला शेतकऱ्यांचे काही घेणेदेणे नसल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केला.
कळंब ता.आंबेगाव येथील २  कोटी १६ लक्ष ४ हजार रुपयांच्या कळंबई गावठाण,कळंब पाणीपुरवठा पंप,कानडेवस्ती,वर्पेमळा सभामंडप,इंदिरानगर वस्ती,गणेशवाडी गोगरटी साकव पूल,मळगंगा सभामंडप इत्यादी विकास कामांचे उद्घाटन आणि भुमीपुजनप्रसंगी   विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते.यावेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद कानडे,माजी सभापती वसंतराव भालेराव ,सरपंच राजश्री भालेराव,पंचायत समितीच्या माजी सदस्या निर्मला भालेराव,मोनिका भालेराव,उपसरपंच डॉ.सचिन भालेराव,भिमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे,माजी सरपंच निता शेळके,बाळशिराम भालेराव,माजी उपसरपंच गंगाराम भालेराव,दत्ता वर्पे,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी भालेराव,उपाध्यक्ष दशरथ थोरात,यशवंत कानडे, डि.आर.भालेराव,तुकाराम कानडे,बाबूराव कानडे,गंगाधर कानडे,किशोर भालेराव,सुहास कहडणे,अनिल भालेराव,पोलीस पाटील तान्हाजी कानडे,शशिकला कानडे,गणेश कानडे,उद्योजक विष्णु कानडे,सुनील भालेराव,बाळशिराम भालेराव,अमित भालेराव,दत्ता कानडे,अनिल कानडे,नवनाथ कानडे,मयूर भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ,गणपती मंडळाचे सभासद  उपस्थित होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले विकासकामे करणाèयांच्या पाठीमागे ग्रामस्थांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.तसेच प्रलंबित विकास कामेही पुर्ण करु असे सांगुन ते म्हणाले विकास कामांमध्ये राजकारण कोणीही आणु नये.ग्रामस्थांनी राजकारण विरहीत विकास होण्यासाठी आग्रही असावे.असे आवाहन त्यांनी केले.पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे म्हणाल्या आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व दिलीप वळसे पाटील करत असल्यामुळे विकास कामांना तोटा नाही.दुष्काळी तालुक्याचे नंदनवन वळसे पाटील यांच्यामुळे झाल्याचे सांगुन त्या म्हणाल्या विकासकामे करणाèया नेतृत्वाला साथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भरभरुन निधी दिल्याने रस्ते,आरोग्य उपकेंद्र,नळयोजना इत्यादी कामे झाली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *