कान्हूर मेसाई,शिरूर : विकासकामांच्या जोरावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेला कान्हूर मेसाईतून देणार मोठे मताधिक्य  – बंडू पुंडे

415

     कान्हूर मेसाई,शिरूर :  कान्हूर मेसाई येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कोट्यावधींची विकासकामे केल्याने कान्हूर मेसाई गावातून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याचे  माजी सरपंच बंडू पुंडे यांनी सांगितले .
कान्हूर मेसाई येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंजुर केलेल्या विविध विकासकामांचे भुमिपूजन व उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी या कार्यक्रमासाठी माजी आमदार पोपटराव गावडे ,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम ,सभापती विश्वास कोहकडे ,शिरुर आंबेगावचे राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,जि.प.सदस्या स्वातीताई पाचुंदकर ,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे ,प्रकाश पवार ,उद्योगपती गुलाब धुमाळ ,अमोल जगताप ,बंडू पुंडे सदाशिव पुंडे ,मोहन पुंडे ,दिपक तळोले ,बबनराव शिंदे ,सुधिर पुंडे ,राजाराम दळवी ,आदि मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना पुंडे म्हणाले की ,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्या स्वातीताई पांचुदकर यांनी विविध विकासकामे मार्गी लावली असून चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीत दिलीप ववसे पाटील यांनी कान्हूर मेसाई गावाकडे विशेष लक्ष दिल्याने जनावरांचा पाणी व चार्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला .दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य देणार असल्याचे पुंडे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *